‘एकीकडे हिंदूत्ववादी सरकार बोलायचं आणि दुसरीकडे मंदिराची जमीन लाटायची असा दोगलेपणा भाजपच करु शकते’

मुंबई   – स्वतः ला हिंदूत्ववादी सरकार बोलायचं आणि दुसरीकडे भाजपचा एक आमदार हिंदुच्या मंदिराची जमीन लाटतो असा दोगलेपणा फक्त भाजपच करु शकते असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर हिंदूच्या मंदिराची जमीन लाटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर भाजपच्या खोट्या हिंदूत्वावर महेश तपासे यांनी जोरदार टीका केली आहे.

भाजप – शिंदेसरकार हे स्वतः ला हिंदूत्ववादी सरकार म्हणते आणि त्याच सरकारमधील भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर मंदिराची जमीन लाटण्याचा गुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झाला आहे असेही महेश तपासे म्हणाले.

स्वतःला हिंदूत्ववादी सरकार म्हणायचं आणि हिंदूच्या मंदिराची जमीन लाटायची हा गंभीर प्रकार आहे. हिंदूच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार भाजपच्या नेत्याच्या माध्यमातून झाला असून त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक झाली पाहिजे अशी मागणी बीडमधील नागरिकांची आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.