‘मेधाताईंसारख्या सज्जन व्यक्तीच या विखारी प्रवृत्तींचा बुरखा फाडू शकतील!’

मुंबई – नर्मदा नवनिर्माण अभियान या एनजीओच्या खात्यावर काही संशयित व्यवहार झाल्याच्या आरोपात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मेधा पाटकर यांच्याविरुद्ध ED कडे संशयास्पद व्यवहारसंदर्भात तक्रार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण 2005 चं असून यासंदर्भात ED चौकशीही करणार आहे.

नर्मदा नवनिर्माण अभियान हे बृन्हमुंबई चॅरिटी कमिश्नर यांच्याकडे नोंदणी असलेले एनजीओ आहे. यात मेधा पाटकर या मुख्य विश्वस्त आहेत. याच एनजीओच्या खात्यावर काही संशयास्पद व्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.  नर्मदा नवनिर्माण अभियानाची बृहनमुंबई चॅरिटी कमिशनर यांच्याकडे नोंदणी आहे या एनजीओच्या खात्यावर एकाच दिवशी १ कोटी १९ लाख २५ हजार ८० रुपयांच्या देणग्या मिळाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, यामुळे उलटसुलट चर्चा सुरु झाली असून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होऊ लगले आहेत.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर पत्रकार हेमंत महाजन (journalist Hemant Mahajan)यांनी एक पोस्ट केली असून या घडामोडींवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘सतरा वर्षांपूर्वीच्या व्यवहारांवरून मेधाताईंना ईडीची नोटीस’, अशी बातमी आहे. नर्मदेतील गोट्यांच्या विकृत आणि विद्वेषी प्रवृत्तीतून सुरु असलेल्या कारवायांना मेधाताई असे चोख उत्तर देतील, की या लोकांच्या बौद्धिक धरणाची उंची किती आहे, तेही लोकांना कळेल!… मेधाताईंसारख्या सज्जन व्यक्तीच या विखारी प्रवृत्तींचा बुरखा फाडू शकतील! असं त्यांनी म्हटले आहे.