‘निस्वार्थ समाजसेवा कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे माई ‘

पुणे : अनाथांची आई म्हणून ओळख असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन झाले आहे. वयाच्या ७३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.काल रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी निधन झाले, पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

सिंधूताई सपकाळ यांच्या निधानानंतर अनेक मान्यवर त्यांना आदरांजली अर्पण करत आहेत. माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी देखील आपल्या भावना यानिमित्ताने व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या , आपल्या कर्तृत्वाने अनाथांची माय अशी ओळख निर्माण करणाऱ्या माई अर्थात पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाने असंख्य अनाथांचे मातृछत्र हरपले अशी शोकभावना मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

माईंनी अनाथांच्या कल्याणासाठी अवघे आयुष्य वेचले. त्यांचे संघर्षमय आयुष्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. निस्वार्थ समाजसेवा कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे माई. त्यांचा प्रेमळ स्वभाव व वात्सल्यमयी व्यक्तिमत्व या माध्यमातून त्यांनी असंख्य भारतीयांच्या मनात घर निर्माण केले. अनाथांची माय होताना त्यांच्या व्यथा वेदनांशी त्या एकरूप झाल्या. बेटा असे संबोधत त्यांनी अनेकांवर मायेचा वर्षाव केला .त्यांच्या निधनाने असंख्य अनाथांचे मातृछत्र हरपले अशी शोकभावना आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.