सभा करायच्याच असतील तर अयोध्यामध्ये करून दाखवा; दिपाली सय्यद यांचे मनसेला आव्हान   

पुणे – राज ठाकरेंच्या पुण्यातल्या सभेचा  मार्ग मोकळा झालाय.आता पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray in Pune ) यांची तोफ धडाडणार आहे. औरंगाबाद, ठाण्यानंतर आता पुण्यात (Pune) राज ठाकरे यांची सभा होणार आहे. पुण्यातील राज ठाकरे यांच्या सभेची जागा ठरली. डेक्कन नदी (Deccan River) पात्रात होणार सभा होणार आहे.

राज ठाकरेंची पुण्यात सभा 21 मे या दिवशी होणार आहे. डेक्कनला नदीपात्रात ही सभा होणार आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी (Permission) दिली आहे.  15 मे रोजी राज यांच्या सभेबाबत हे पत्र दिले होते. काल येथील जागेची पाहणी करण्यात आली आणि आता परवानगी मिळाल्याने नदी पत्रात राज ठाकरे यांची सभा होणार आहे. मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे शहरात सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पुणे शहर सरचिटणीस अजय शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

दरम्यान, राज ठाकरेंच्या या सभेपूर्वी शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद (Shiv Sena leader Deepali Syed) यांनी टोला लगावला आहे. सभा करायच्याच असतील तर अयोध्यामध्ये (Ayodhya) करून दाखवा… पुण्यामध्ये तर शिवसेनेचे नगरसेवक (Corporator) पण सभा घेतात, तेही जास्त गर्दी करून, असा टोला दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.