Maratha Reservation | ‘सगेसोयरेविरोधात साडेसहा लाख हरकती नोंदवण्यात आल्यात’; छगन भुजबळांची माहिती

Maratha Reservation Special Assembly Session Live : विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या असून, या अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याबाबतचा कायदा करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या विशेष अधिवेशनात सरकारने काढलेल्या सगेसोयरेंच्या कुणबी नोंदी संदर्भातील अधिसुचनेचा मुद्दा येण्याची शक्यता कमीच असल्याचं दिसतंय.

दरम्यान, आता मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) संदर्भात मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सगेसोयरेविरोधात साडेसहा लाख हरकती नोंदवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, आरक्षण टिकावे यासाठी बिल तयार करण्यात आले आहे. अनेक माजी न्यायमूर्तींनी यावर लक्ष घेतले आहे. अद्याप प्रस्ताव आमच्या हातात आलेला नाही. सगेसोयरेविरोधात साडेसहा लाख हरकती नोंदवण्यात आला आहेत. समता परिषद ओबीसी संघटांनाचे मी अभिनंदन करतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऐतिहासिक! रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताचा इंग्लंडवर सर्वात मोठा विजय, ४३४ धावांनी जिंकली कसोटी

Sunetra Pawar | सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या सुनेत्रा पवार नेमक्या कोण आहेत?

Ambernath | धक्कादायक ! चोरीच्या संशयातून दोन तरुणांना जमावानं बेदम मारहाण करून संपवलं