Asaduddin Owaisi | “नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत, आम्ही…”, असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य

Asaduddin Owaisi On Narendra Modi : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी रविवारी (18 फेब्रुवारी) महाराष्ट्रातील अकोला येथील रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) हल्ला चढवला. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत, यासाठी आम्ही घटकपक्ष एकत्र आलो आहोत, असे असदुद्दीन ओवौसी (Asaduddin Owaisi) यावेळी म्हणाले. इंडिया आघाडीकडून मला कोणतंही निमंत्रण आलं नाही. उलट आम्हीच इंडिया आघाडीला ऑफर दिली होती असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, “मी दिल्लीत बसलेल्या चौधरींना सांगू इच्छितो की आज नरेंद्र मोदी जिंकले तर ते मुस्लिमांमुळे नाही तर त्यांनी हिंदू हृदयसम्राटाची प्रतिमा निर्माण केली आहे. सर्व बहुसंख्य समुदायांना एकत्र करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात मुस्लिमांना उपेक्षित केले आहे.”

‘ख्वाजा अजमेरीच्या दर्ग्यावर मोदी चादर चढवतात. पण ख्वाजा अजमेरीवर हे तुमचं कोणतं प्रेम आहे की, तुम्ही मशीद आमच्याकडून हिसकावून घेताय. हे कुठलं प्रेम आहे, तुम्ही मशिदीत चादर चढवणार, पण आमच्या मुलींचा हिजाब हिसकावून घेणार. आमच्याकडून मशीद हिसकावून घेण्याचे हे जे प्रयत्न सुरु आहेत, ते कोणतं प्रेम आहे?’, असा सवालही त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या-

Jayant Patil भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

भाजपसोबत युती करणार का?; आशिष शेलार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीसह जाणार? आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, तासभर चर्चा