Ambernath | धक्कादायक ! चोरीच्या संशयातून दोन तरुणांना जमावानं बेदम मारहाण करून संपवलं

Ambernath | चोरी  करण्यासाठी आले या संशयातून दोन तरुणाची जमावानं बेदम मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ (Ambernath) पूर्वेतील दुर्गादेवी पाडा परिसरात साई कृपा कॉलनी येथे घडली आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या जमावापैकी 20 जणांना संशियत म्हणून पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज परमार आणि सूरज उर्फ भैय्या निर्मल कोरी अशी मृत तरुणांची नावं आहेत. हे दोघंही अंबरनाथ शहरातील प्रकाशनगर आणि शिवमंदिर परिसरात राहत होते.

अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा परिसरात (17 फेब्रुवारी) सकाळी या दोघांचे मृतदेह आढळून आले. याविषयी माहिती मिळताच तात्काळ शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दोन्ही तरुणांना चोर समजत जमावानं मारहाण करून हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय.

महत्वाच्या बातम्या

Lok Sabha Elections | भाजपचे आजपासून राष्ट्रीय अधिवेशन; लोकसभा निवडणुकीचा रोडमॅप तयार

Rooftop Solar Scheme | घराच्या छतावर सोलर पॅनेल लावायचे आहेत? बँका गृहकर्ज देऊन वित्तपुरवठा करणार आहेत

‘भाजपामुळे राज्याची संस्कृती बिघडली, चिखलफेकीसाठी टोळ्या भाड्याने…’; चिपळूणच्या राड्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया