Sunetra Pawar | सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या सुनेत्रा पवार नेमक्या कोण आहेत?

Sunetra Pawar Vs Supriya Sule : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीनंतर पवार घराण्यात संघर्ष वाढत आहे. आजवर जेष्ठ नेते शरद पवारांवर लोकाची घरे फोडल्याचा आरोप होत होता मात्र आता पवारांना त्यांच्याच घरातून आव्हान निर्माण झाले असून आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये (Baramati Lok Sabha constituency) नणंद भावजय यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे.

बारामतील लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे या विद्यमान खासदार आहेत, तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठी सातत्याने चर्चेत येत आहे. अजितदादा यांना महायुतीची साथ मिळाली तर बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव शक्य असल्याचे अनेकांनी अंदाज वर्तवले आहेत यामुळे आगामी निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे.

कोण आहेत सुनेत्रा पवार?
60 वर्षीय सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या अजित पवार यांच्या पत्नी आहेत. त्यांचे भाऊ पद्मसिंह पाटील हे माजी मंत्री होते, तर त्यांचे भाचे राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील हे उस्मानाबादचे भाजपचे आमदार आहेत. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना दोन मुलं आहेत. जय आणि पार्थ पवार. 2010 मध्ये स्थापन झालेल्या एनजीओ एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या त्या संस्थापक आहेत.

भारतातील इको-व्हिलेजची संकल्पना विकसित करण्यात त्या मार्गदर्शक ठरल्या आहेत. सुनेत्रा पवार या स्वदेशी आणि प्रसिद्ध शैक्षणिक संस्था विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त देखील आहे. वेबसाइटनुसार, सुनेत्रा पवार 2011 पासून फ्रान्सच्या वर्ल्ड एंटरप्रेन्योरशिप फोरमच्या थिंक टँक सदस्यही आहेत.

महत्वाच्या बातम्या

Lok Sabha Elections | भाजपचे आजपासून राष्ट्रीय अधिवेशन; लोकसभा निवडणुकीचा रोडमॅप तयार

Rooftop Solar Scheme | घराच्या छतावर सोलर पॅनेल लावायचे आहेत? बँका गृहकर्ज देऊन वित्तपुरवठा करणार आहेत

‘भाजपामुळे राज्याची संस्कृती बिघडली, चिखलफेकीसाठी टोळ्या भाड्याने…’; चिपळूणच्या राड्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया