प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर मुलगा गश्मीर महाजनीची पहिली प्रतिक्रिया

ज्येष्ठ मराठी अभिनेते रविंद्र महाजनी(Ravindra Mahajani)यांचं निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते. पुण्याजवळील (Pune) आंबी परिसरात राहत्या घरी पोलिसांना काल त्यांचा मृतदेह(Dead Body)आढळला असून गेले 2 दिवस त्यांच्या घराचं दार बंद असल्यानं पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी याला तत्काळ कळवलं. वडिलांच्या निधनाने मुलगा गश्मीर महाजनीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

“बाबा तेव्हाच्या काळात खूप देखणे होते. मी त्यांच्याइतका देखणा दिसतो, असं मला वाटत नाही. हे मी प्रामाणिकपणे सांगतो. पण, मी स्मार्ट आहे. माझा वेगळा चार्म असेल, जो कदाचित मुली आणि मुलांनाही आवडेल. मी बाबांसारखा हँडसम दिसत नाही. म्हणून मला फ्रेश दिसण्यासाठी त्यांच्यापेक्षा जास्त प्रयत्न करावा लागतो. स्क्रीनवर चांगलं दिसण्यासाठी बाबांना कधी प्रयत्न करावा लागला नाही. त्यांना ती दैवी देणगी मिळाली होती,” असं गश्मीर राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता.