“हाताला फोड येईपर्यंत एकाच शॉटचा सराव करायचा”, यशस्वी जयस्वालच्या प्रशिक्षकांचा मोठा खुलासा

IND vs WI : डोमिनिका मैदानावर झालेला भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील पहिला कसोटी सामना पाहुण्याभारतीय संघाने १ डाव १४१ धावांनी जिंकला. भारतीय संघाच्या या मोठ्या विजयाचा शिल्पकार राहिला युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal). त्याने तर पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक ठोकत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. यानंतर यशस्वी जयस्वालच्या प्रशिक्षकांनी (Yashasvi Jaiswal Coach) मोठा खुलासा केला आहे,

राजस्थान रॉयल्सचे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर आणि मुंबईचे माजी फलंदाज झुबिन भरुचा यांनी सांगितले की, “जयस्वाल महाराष्ट्रातील तळेगाव येथील प्रशिक्षण शिबिरात ३०० वेळा एकाच शॉटचा सराव करत असे. आपली ताकद वाढवण्यासाठी त्याने बेसबॉल प्रशिक्षकासोबतही काम केले. तो बराच वेळ फलंदाजी करत असे आणि यामुळे त्याच्या हातावर फोडही यायचे.”