मराठमोळ्या अभिनेत्याचं ८५ टक्के निकामी झालं होतं फुफ्फुसं; म्हणाला, “सर्जरीनंतर जवळपास पांगळा झालो होतो”

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक विद्याधर चौधरी हे गेल्या काही वर्षांपासून गंभीर आजाराने त्रस्त आहेत. या आजाराबद्दल त्यांना कोरोनाच्या काळात समजले. विद्याधर जोशी यांना ‘फुफ्फुसांचा फायब्रॉसिस’ हा आजार झाल्याचे सांगण्यात आले.

मुंबई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आजाराबद्दल सांगताना विद्याधर चौधरी म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेत मला कोरोनाची लागण झाली होती. त्यातून मी बरा झालो आणि काही दिवसानंतर दुसऱ्यांदा कोरोना झाला. त्यावेळी हा ताप साधा नसून यामागे वेगळे कारण असल्याचे माझ्या लक्षात आले. ‘सिटी स्कॅन केले. त्यानंतर समजले की, फुफ्फुसांवर जखम झाली आहे. पुढे फुप्फुसांचा फायब्रॉसिस झाल्याचे निदान झाले. त्यानंतर आणखी काही टेस्ट करण्यात आल्यानंतर इंटरस्टीशीयन लंग्स डिसिस झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या आजारावर कुठलेच औषध नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हा आजार बराही होणार नाही फक्त तो आजार वाढू नये यासाठी मला औषध देण्यात आली. अशाही परिस्थितीत खचून न जाता मी सकारात्मक राहिलो. मालिकेतही काम करू लागलो. मात्र डिसेंबर ते जानेवारी या अवघ्या दोनच महिन्यात त्यांची फुफ्फुसं ८५ टक्के निकामी झाली असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यावेळी मी जीवाची होतीया काहिली मालिकेत काम करत होतो. आजार वाढल्यामुळे आणि प्रकृती जास्त खालावली. त्यामुळे मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर माझे दोन्ही फुफ्फुसं निकामी झाली. त्यावर मला फुफ्फुस प्रत्यारोपण करण्याचा एकमेव पर्याय सांगितला. ही शस्त्रक्रिया खूप खर्चिक असूनही मी तो करण्याचा निर्णय घेतला. १२ जानेवारी रोजी माझ्यावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली. पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी जवळपास पांगळे झाले होते. पायाचे बोटही हलवता येऊ शकत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपले शरीर किती मौल्यवान आहे याची जाणीव मला यादरम्यान झाली. आपल्याकडे देण्यासारखे काहीच नाही. पण जेव्हा जातो तेव्हा अवयव तरी दान केले पाहिजे असे प्रकर्षाने जाणवले. मी आज वाचलो ते कोणीतरी मला फुफ्फुस दान केल्यामुळेच असे ते सांगतात, असे विद्याधर चौधरी म्हणाले.