महाराष्ट्रावर घाव घातला जात आहे, पण शिवसेना तसं होऊ देणार नाही – संजय राऊत

मुंबई – विधान परिषदेच्या निकालाने (Result of the Legislative Council) महाविकास आघाडीला (MVA) झटका बसला असून, शिवसेनेतील (Shivsena) महत्त्वाचे नेते आणि सध्या कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्त आहे. शिंदे हे सध्या गुजरातमध्ये (Eknath Shinde in Gujarat) गेले आहेत. सध्या ते सुरतमधील ली मेरिडिअन या हॉटेलमध्ये आहेत अशी माहिती समोर येत आहे.

एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गेले आहे. ते काही गैरसमजातून गेले आहे. ते आमच्या संपर्कामध्ये आहे. एकनाथ शिंदे सुद्धा मुंबईच्या बाहेर आहे, पण त्यांच्याशी आमचा संपर्क झाला आहे. ज्या प्रकारे चित्र निर्माण केले जात आहे. त्यामध्ये काहीही तथ्य नाही, असा दावा शिवसेनेचे पक्षप्रमुख संजय राऊत यांनी केला आहे.

शरद पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात सगळे नेते संपर्कात आहे. महाराष्ट्रात राजस्थान, मध्यप्रदेश पॅटर्न लागू करून सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे.पण महाराष्ट्रात हे होणार नाही. महाराष्ट्रावर घाव घातला जात आहे, पण शिवसेना तसं होऊ देणार नाही. शिवसेनेवर हल्ला करण म्हणजे महाराष्ट्र दुबळा करणे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.