IPL 2024: वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचे मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन, बजावणार ‘ही’ भूमिका

श्रीलंकेचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा (Lasith Malinga) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) मध्ये परतला आहे. आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकाची (Mumbai Indians Fast Bowling Coach) जबाबदारी मलिंगाकडे सोपवण्यात आली आहे. तो शेन बाँडची (Shane Bond) जागा घेणार आहे. बाँडने गेल्या 9 हंगामात हे पद भूषवले होते. मलिंगाने 2021 मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर 2022 मध्ये राजस्थान रॉयल्समध्ये वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले होते. दोन हंगाम तो या पदावर राहिला.

याआधी मलिंगाने 2018 मध्ये मुंबईचे मेंटर म्हणून काम केले होते. मुंबईचा सपोर्ट स्टाफ म्हणून मलिंगाचा हा दुसरा हंगाम असेल. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने पाच विजेतेपदही जिंकले. यामध्ये 2013, 2015, 2017, 2019 मधील चार आयपीएल आणि 2011 मधील चॅम्पियन्स लीग टी20 यांचा समावेश होता.