भाजपाचे खासदार म्हणतात, पंतप्रधान आणि अर्थमंत्री दोघांनाही अर्थशास्त्र समजत नाही

देशभरात महागाईमुळे सामान्यांच आर्थिक गणित कोलमडलं असून यासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका विरोधक करत आहेत. कॉँग्रेसने अनेकदा केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. पण आता भाजपा खासदाराने केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहे. भाजपा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर, विशेषत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यावर निशाणा साधला.

महागाई आणि आर्थिक धोरणांना कारणीभूत ठरविले आहे. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी देशातील महागाईसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना जबाबदार धरलं. देशातल्या महागाईसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन जबाबदार आहेत. सरकारला अर्थशास्त्र कळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी आणि सीतारमन यांना देखील अर्थशास्त्र कळत नाही.