बॉलीवूडच्या ‘ बबली ‘ वर भाळला कतरिना कैफचा भाऊ

तर मग वाचकहो .. ! इंस्टाग्राम वर कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाचे अनेक फोटोज तुम्ही पाहिले असतील . अगदी राजेशाही थाटात या दोघांनी लग्न केले . या लग्न सोहळ्यामध्ये दोघांच्याही कुटुंबीयांनी उत्साहाने सहभाग घेतला .  लग्नात पार पडलेले विधी आणि त्यासाठी कतरिना आणि विकी यांच्या फोटोसह त्यांच्या कुटुंबियांनी देखील आपले फोटोज इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत . त्यातील एक फोटो इन्स्टा प्रेमींचे लक्ष अधिक आकर्षित करून घेत आहे .  ही इन्स्टा पोस्ट आहे कत्रिना कैफच्या भावाची म्हणजेच सबॅस्टिन लॉरेन मायकल याची ….

https://www.instagram.com/p/CXYKtpGMgLh/

त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे . या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की कतरीना सोबत तिच्या दोन बहिणी आहेत . आणि तिसरी एक अभिनेत्री आहे . च अभिनेत्रीला त्याने Pretty Cool असे म्हंटले आहे.  तर चला मग पाहुयात कोण आहे जिने सबॅस्टिनचे रुदय घायाळ केले आहे .

तर ही बॉलिवूड अभिनेत्री आहे शर्वरी वाघ  …  शर्वरी नुकतीच आपल्याला ‘ बंटी और बबली 2 ‘ या फिल्ममध्ये दिसली आहे . तर शर्वरी ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे . या फोटोवर सबॅस्टिनने लिहिले आहे की , मी काहीतरी चांगलेच माझ्या आयुष्यात केले असेल जेणेकरून असे सुंदर कुटुंब मला मिळाले आहे . ” शर्वरी इज प्रिटी कुल टू ”  … असे सबॅस्टिनन त्याच्या कॅप्शन मध्ये लिहायला विसरला नाहीये .