अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या मौलानाला नागरिकांनी विवस्त्र करत धू-धू धुतला

नायगाव –  नायगावमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या मौलानाला स्थानिकांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. नूरल हसन असं या मौलानाचे नाव असून  या वासनांध मौलानाला स्थानिकांनी चांगलाच चोप दिला असून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही ७ वर्षांची आहे.  ही मुलगी मुलगी सुट्टे पैसे मागण्यासाठी गेली असताना या मौलानाने तिला आमिष देऊन तिच्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला.यावेळी मुलीने आरडा- ओरड करून पळ काढला.

यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. पुढे मग जमलेल्या नागरिकांनी या मौलानाला बेदम चोप देत पोलिसांच्या (police) स्वाधीन केले आहे. याप्रकरणी अधिक तपास वसई वालीव पोलीस करत आहेत. या संतापजनक प्रकारामुळे या परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण झाले होते.