शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीत भीषण अपघात

Hemant Godse: शिंदे गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा आज भीषण अपघात (Hemant Godse Car Accident) झाला आहे. दिल्लीतील बी.डी. मार्गावर शिंदे गटाचे खासदार गोडसे यांच्या कारचा अपघात झाला. यात त्यांच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने गोडसे या अपघातातून बचावले आहेत.

शिवजयंती निमित्त दिल्लीत कार्यक्रम असतो. संसदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी खासदार गोडसे हे काल राजधानीमध्ये आले होते. आज कार्यक्रम संपल्यावर ते त्यांच्या निवासस्थानाच्या दिशेन परत जात असताना, एका गाडीला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या एका वाहनाने त्यांच्या गाडीला जोरात ठोकर मारली. आणि हा भीषण अपघात झाला. यामध्ये गोडसे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही, पण त्यांच्या गाडीचं बरंच नुकसान झालं आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऐतिहासिक! रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताचा इंग्लंडवर सर्वात मोठा विजय, ४३४ धावांनी जिंकली कसोटी

Sunetra Pawar | सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या सुनेत्रा पवार नेमक्या कोण आहेत?

Ambernath | धक्कादायक ! चोरीच्या संशयातून दोन तरुणांना जमावानं बेदम मारहाण करून संपवलं