‘शाहीन अक्रम होऊ शकत नाही, त्याला चन्याच्या झाडावर चढवू नका’, शास्त्रींची खोचक टीका

Ravi Shastri Criticize Shaheen Afridi: ICC क्रिकेट विश्वचषक 2023 च्या 12 व्या सामन्यात भारतीय संघाने 117 चेंडू बाकी असताना पाकिस्तानचा (India vs Pakistan) सात विकेट राखून पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाने शानदार प्रदर्शन करत पाकिस्तानचा डाव अवघ्या 42.5 षटकांत 191 धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात कर्णधार रोहित शर्मा (86) आणि श्रेयस अय्यर (53*) यांच्या सुरेख अर्धशतकांच्या जोरावर 30.3 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले.

भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. वर्ल्ड कप 2023 मध्ये कॉमेंट्री करत असलेले शास्त्री या व्हिडिओमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजीवर जोरदार टीका करताना दिसले. त्यांनी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचा (Shaheen Afridi) तीव्र शब्दांत निषेध केला.

या व्हिडिओमध्ये रवी शास्त्री म्हणतात की, ‘नसीम शाह याच्यासाठी योग्य पर्याय कोण बनू शकतो हे पाकिस्तानला पाहावे लागेल. तुम्ही शाहीन आफ्रिदीचे खूप कौतुक करत आहात. तो वसीम अक्रमसारखा (Wasim Akram) स्विंग करतो आणि सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट घेतो, अशी स्तुती केली जात आहे. तो नवीन चेंडूवर विकेट घेऊ शकतो, तो चांगला गोलंदाज आहे. पण एवढंही ऑफर करायची गरज नाही. जेव्हा ते ठीक असते तेव्हा आपल्याला म्हणायचे असते की ते ठीक आहे, चांगले नाही. तो चांगला नाही हे मान्य करावे लागेल. स्वीकार करा.’

शास्त्री पुढे म्हणाले, ‘शाहीन शाह आफ्रिदी हा वसीम अक्रम नाही. तुम्ही त्याची तुलना करू शकत नाही. तो लयीतही दिसत नाही. तुम्ही फक्त म्हणता की हो तो सभ्य गोलंदाज आहे. ते त्याला चन्याच्या झाडावर चढवू नका. तो वसीम अक्रम होऊ शकत नाही.’

सध्याच्या विश्वचषकात शाहीन आफ्रिदी खूपच सरासरी गोलंदाज असल्याचे दिसून येत आहे आणि त्याला नवीन चेंडूचा स्विंगही मिळत नाही. या कारणास्तव, पाकिस्तानची गोलंदाजी विरोधी फलंदाजांसमोर अगदी सामान्य आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा