शहराचे नाव बदलण्याचा धडाका सुरूच; जनतेच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी बदलले ‘या’ शहराचे नाव

Bhopal – मध्य प्रदेशातील शहरांच्या नामांतराची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. राज्य सरकारने आता सिहोर जिल्ह्यातील नसरुल्लागंज या शहराचे नाव बदलले आहे. सरकारने आता त्याचे नाव बदलून भैरुंदा ठेवले आहे. नाव बदलण्याची अधिसूचना सरकारने जारी केली होती. नसरुल्लागंजचे नाव बदलण्याचा प्रस्ताव सरकारने काही महिन्यांपूर्वी केंद्राकडे पाठवला होता. त्यावर केंद्रीय गृहमंत्रालयाची मंजुरी मिळाली.

विशेष म्हणजे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 2 एप्रिल रोजी एका कार्यक्रमात नसरुल्लागंजचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. हे शहर मुख्यमंत्री शिवराज यांचा विधानसभा मतदारसंघ बुधनी येथील आहे. रविवारी सायंकाळी सिहोर जिल्ह्यातील नसरुल्लागंज नगरपरिषदेच्या गौरव दिन कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. रविवारपासून सरकारी कागदपत्रांमध्ये नसरुल्लागंजचे नाव बदलून भैरुंदा करण्यात येणार आहे.