भारताची प्रतिष्ठा वाढत आहे हे पाहून पाकिस्तानी बिलावल भुट्टोच्या बुडाला आग लागणे हे स्वाभाविकच आहे – खत्री 

पुणे – भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला चांगलंच फटकारलं आहे. यानंतर पाकिस्तानला चांगल्याच मिरच्या झोंबल्या असून परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टोने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे (Bilawal Bhutto has targeted Indian Prime Minister Narendra Modi). बिलावल भुट्टो झरदारी यांनी नरेंद्र मोदींचा उल्लेख गुजरातचा कसाई असा केला आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरून भाजपने आज देशभरात आंदोलने केली असून भाजप नेते गिरीश खत्री यांनी भुट्टो यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले,  पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. बिलावल भुट्टोचे ते वक्तव्य अत्यंत अपमानास्पद आणि भ्याडपणा दाखविणारे आहे. आतंकवाद्यांचा बालेकिल्ला असलेला पाकिस्तान आणि तिकडे असणारे नेते हे किती भिकारड्या मानसिकतेचे आहेत हेच यावरून दिसून येते.

चीन,अमेरिका आणि इतर देशांनी फेकलेल्या तुकड्यांवर गुजराण करणाऱ्या पाकड्यांनी भारताचे विकासपुरुष पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकणे होय. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे जागतिक स्तरावर कौतुक केले जात आहे, भारत विकासाचे अनेक टप्पे गाठत आहे, भारताची प्रतिष्ठा वाढत आहे हे पाहून बिलावल भुट्टोच्या बुडाला आग लागणे हे स्वाभाविकच आहे. मोदींचा अपमान करणाऱ्या ‘पिलावळ भुट्टो’ने हे लक्षात घ्यावं की आता भारतात कॉंग्रेस नाही तर आता राष्ट्रप्रेमी भाजपचे सरकार आहे. तुमच्या गरळ ओकण्यामुळे तुम्हाला आगामी काळात वाईट परिणाम देखील भोगावे लागतील एकंदरीत असचं दिसतंय.