मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा अभिनेता किरण मानेंना पाठिंबा, म्हणाले…

मुंबई – स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ( mulgi zali ho ) या लोकप्रिय मालिकेत अभिनेते किरण माने विलास पाटालाची भूमिका साकराताना दिसतात. अभिनेते किरण माने त्यांच्या भूमिकेमुळे जितके चर्चेत असतात तितकेच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चर्चेत असतात. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात. मात्र आता याच राजकीय भूमिकांमुळे ते अडचणी साडपले आहेत.

त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण माने यांनीच यासंदर्भात खुलासा करत राजकीय भूमिकेमुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं आहे.

किरण माने यांनी काही वेळापूर्वी एक फेसबुक पोस्ट टाकली. त्यात काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो, बीज हूँ मैं. पेड बन ही जाऊंगा! असं म्हटले आहे. या पोस्टनंतर आता सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे. माने यांच्या भूमिकेचं त्यांच्या चाहत्यांकडून जोरदार समर्थन केलं जात आहे. #istandwith_KiranMane हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

अनेक उलटसुलट प्रतिक्रिया या निमित्ताने येवू लागल्या आहेत. अनेकांनी याला संस्कृतिक दहशतवाद म्हटलंय. तर काही प्रमाणत माने यांना ट्रोल देखील केले जात आहे. यातच आता मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी किरण माने यांना पाठिंबा दर्शविला आहे. माने केंद्र सरकारविरोधात (Central Government) लिहतात म्हणून त्यांना हटवलं गेलं. कुणाच्या भाकरीवर टाच आणणं चुकीचं आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. त्यांनी आपली भूमिका ट्विटद्वारे मांडली आहे.