सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली; मनसेच्या आमदाराची बोचरी टीका

Mumbai – शिवसेना (shivsena)  आणि संभाजी ब्रिगेडनं (sambhaji brigade) राज्यातील आगामी सर्व निवडणुका एकत्रित लढवण्याची काल घोषणा केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray and Sambhaji Brigade president Manoj Akhre) यांनी मुंबईत पत्रकारांना ही माहिती दिली. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित मेळावे देखील घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ही वैचारिक युती असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या एकत्र येण्यानं एक चांगलं समीकरण तयार होईल, अशी आशा आखरे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, हिंदुत्व विरोधी संघटनेशी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाने युती केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय. दुसरीकडे मनसेचे आमदार राजू पाटील एक ट्विट करून शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर हल्ला चढवला आहे. सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली…, असं खोचक ट्विट करून राजू पाटील यांनी शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर टीका केली आहे.