75 दिवसांत रायगड ते हिमालय ते ही पायी मानलं रे पट्ट्या

माणसाला अनेकदा अनेक अडचणी येतात, या अडचणी इतक्या मोठ्या असतात की माणसाला नको नको होतं पण तरी देखील माणूस ते करत राहतो, त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. अनेकदा तर अडचणी देखील माणसाच्या जिद्दीसमोर हात टेकतात आणि त्या व्यक्तीला समोर दिसते ते त्यांचे स्वप्न जे सत्यात उतरलेले असते.

भिवंडीतल्या एका तरुणाने असचं एक स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरविलं देखील. रायगड आणि हिमालय हे दोन्ही शब्द जरी वाचले तरी त्यांची ऊंची थोडी धडकी भरविते पण या तरुणाने ही दोन्ही टोके सर केली आणि एक नवीन इतिहास रचला आहे. रायगड ते हिमालय हे अंतर त्याने  पायी चालत पूर्ण केले आहे. भिवंडीत राहणाऱ्या सिद्धार्थ गणाई याचं आयुष्य खूप अवघड आहे पण त्यांच्यामध्ये असलेल्या जिद्दीमुळे तो त्यांची वेगळी स्वप्न पूर्ण करत आहे.

सिद्धार्थ लहान होता तेव्हा त्यांचे आई-वडील विभक्त झाले.त्यांच्या बालमनावर या गोष्टीचा फार वेगळा परिणाम झाला. आधी त्यांचे वडील त्यांचा सांभाळ करायचे पण त्यांची आर्थिक स्थिती फारशी बरी नव्हती. त्यामुळे नंतर त्यांनी त्यांचा सांभाळ केला नाही.त्या नंतर त्यांनी काही वर्ष पूलांखाली राहून काढली.

तेव्हा पोलिसांच्या लक्षात आले त्यांनी त्यांच्या आईचा शोध घेतला. त्यांची आई केरळमध्ये होती.त्यांचे प्राथमिक शिक्षण केरळामध्ये झाले, नंतर तो पुन्हा मुंबईत आला. त्यांच्या मावशीने आणि इतर काही नातेवाईकांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले.सध्या तो भिवंडीतील बापगाव येथील मैत्रिकुल येथे राहतो. सिद्धार्थला माऊंट एवरेस्ट सर करायचे आहे पण त्यांच्याकडे तितके आर्थिक पाठबळ नसल्यामुळे सध्या तो करू शकला नाही.

त्यांच्याकडे ना कोणती गाडी आहे ना सायकल त्यामुळे तो वेगळं काही करू शकत नव्हता. त्यामुळे त्याने रायगड ते हिमालय पायी चालत सर करण्याचा निर्णय घेतला. त्याने एकूण 75 दिवसांचा प्लान केला. रोज तो यासाठी 35 ते 40 किलोमीटर चालायचा. हे करत असताना त्याने टीवायबीएची ऑनलाइन परीक्षा देखील दिली. परीक्षेसाठी तो किमान तासभर तरी अभ्यास करत असे. सिद्धार्थने चालत असताना आणखी एक उत्तम काम केले आहे, ते म्हणजे त्याने रस्त्याने बऱ्याच झाडांच्या बिया पुरल्या आहेत. यामुळे निसर्गाला मोठी मदत होणार आहे.