राज्याच्या इतिहासात आतापर्यंत इतके अपयशी गृहमंत्री पाहिले नाही, फडणवीसांवर आमदार खडसेंचा हल्लाबोल

Eknath Khadse: आतापर्यंत भाषण केलेल्या वक्त्यांनी आपल्यामध्ये ताकद निर्माण करून आपले सरकार निर्माण होईल असे जोशदायक वातावरण निर्माण केले आहे. आता पुढच्या महिन्यात कदाचित निवडणुकांची आचारसंहिता लागेल निवडणुका या वाऱ्यावर जिंकता येत नाही. निवडणुका जिंकण्यासाठी संघटनेचे बळ हे लागतेच. संघटनेमध्ये कार्यकर्ता तयार झाल्यानंतर, सभासद नोंदणी, पक्षाचा सदस्य, सक्रिय सदस्य असेल तर कार्यकर्ता असा असला पाहिजे की, त्याला कोणत्याही आदेशाची वाट न पाहता काम करण्याची क्रिया केली गेली पाहिजे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे म्हणाले.

एकनाथ खडसे म्हणाले की, महाराष्ट्र अशांत आहे. गृहखात फेल झाल आहे. मी विधान परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांना म्हटलं होतं. तुमच्यासारखा अपयशी गृहमंत्री मी पाहिला नाही. त्यावेळी ते चांगले संतापले होते. तसंही त्यांचा आणि माझं प्रेम जास्त आहे. मग त्यांनी गुन्हे कमी झाल्याचे पुरावे दाखवले. पण जर गुन्ह्यांची नोंदच होत नसेल तर कुणीत कमी झाले हे कसं म्हणता येईल. सध्या राज्यात पोलीस यंत्रणा लाचार झाली आहे. पोलीस सध्या फक्त विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे त्यांना अटक करणे एवढे एकच काम करत आहेत. सत्ताधारी पक्षाचे गुंड जरी असतील तर त्यांना संरक्षण देण्याचे काम केले जाते. यावेळी खडसेंनी पुण्यातील एका मुलीवर अत्याचार झाल्याचं सांगितलं. ही मुलगी डेंटिस्ट कॉलेजला शिकायला आहे. तीन महिन्यापूर्वी तिच्यावरती एका गुंडाने तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. मात्र गृह खात्याकडून कुठलेही कारवाई करण्यात आली नाही असे एकनाथ खडसे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात