राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही -आमदार अनिल देशमुख

Anil Deshmukh: आपल्या सर्वांना कल्पना आहे की, गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचे राजकारण चालू आहे व ते महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. शेतकरी अडचणीत असताना सुद्धा हे सरकार त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक, कांदा उत्पादक, संत्रा उत्पादक शेतकरी आज प्रचंड अडचणीत आहे पण या झोपलेल्या सरकारचे त्यांच्याकडे लक्ष नाही. विजेचा, पिक विम्याचा प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये आहे पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही.

अनिल देशमुख म्हणाले की, पंतप्रधानांनी एक स्टेटमेंट दिलं की, शरद पवार (Sharad Pawar) सहाब ने क्या किया? पण पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एका मुलाखतीत साहेबांच्या कामांचे कौतुक केले होते व त्यांना शेतकऱ्यांच्या मसीहा असे म्हटले होते. अजित दादांनी केलेली गद्दारी ही लोकांना पटलेली नाही, लोक त्याचा योग्य वेळी हिशोब घेतील. पुढील काळामध्ये आपल्याला सत्ताधाऱ्यांचे खोटी आश्वासने लोकांपुढे आणणे गरजेचे आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही, व त्यासाठी आपल्याला एकत्रित मिळून काम करणे अत्यंत गरजेचे आहे असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

अनिल देशमुख म्हणाले की, राजकीय लोकांना ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून त्रास देत आहेत व राजकीय विरोधकांना थेट शत्रू ठरवले जात आहे. महाराष्ट्रात कधी नव्हता तो राजकीय द्वेषाचा पायंडा पाहायला मिळत आहे, अनेक राज्यात राजकीय विरोधकांचे तोंड दाबण्याचे प्रयत्न हे सरकार करत आहे. पोलिसांना हाताशी घेऊन माझ्यावर शंभर कोटींचे आरोप करण्यात आले, माझ्या घरावर १२० धाडी पडल्या व २१० लोकांची चौकशी झाली. चौकशीअंती परमवीर सिंग यांनी कोर्टामध्ये एफिडेविट दिला की अनिल देशमुख यांच्या आरोपांवर माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत व ऐकीव माहितीच्या आधारे त्यांच्यावर आरोप केले त्यानंतर मला बेल मिळाली व खोट्या प्रकरणात मला फसवण्यात आलं आणि १४ महिने मला तुरुंगात पाठवलं. मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये जिथे अजमल कसाबला ठेवले होते तिथे मला ठेवण्यात आले. आपल्या सर्वांना एकत्रित राहून पुढील काळामध्ये या सरकारला लोकसभा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पराभूत करण्यासाठी प्रयत्न करू असे अनिल देशमुख म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात