‘काल गांधींच्या पुतळ्यासमोर बसलेल्या रोहित पवारांचा आज गांधींच्या मार्गावर विश्वास नाही ?’ 

मुंबई –  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ३ मार्च पर्यंत ED कोठडी सुनावली आहे. टेरर फंडिंग केल्याचा आरोप असणाऱ्या मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्ते  हे या अटकेच्या कारवाईचा निषेध व्यक्त करत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घडामोडींवर भाष्य करताना भविष्यातील वाटचाल कशी असावी याबाबत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले,आरोप करून रान उठवायचं, बदनामी करून नेरेटिव्ह सेट करायचं, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून संविधानाने दिलेला आवाज उठवण्याचा हक्क चिरडायचा, असे प्रयत्न कपटी शत्रू करत असेल तर त्याविरोधात गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच भगतसिंग, राजगुरूंच्या आक्रमकतेच्या मार्गानेही लढावं लागेल.

दरम्यान, पवार यांच्या भगतसिंहांच्या मार्गाचा उल्लेख करत भाजयुमोचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, रोहित पवारांना गांधींच्या मार्गावर विश्वास नाही का? काल तर गांधींच्या पुतळ्यासमोर बसले होते आज भगतसिंगांचे नाव घेत आहेत! असा टोला वाघमारे यांनी लगावला आहे.