मातोश्री येथे असा एक सोंगाड्या आहे जो सकाळी भगवा, दुपारी हिरवा आणि रात्री सप्तरंगात असतो; अंधारेंना मनसेचे प्रत्युत्तर

मुंबई – मनसे आणि ठाकरे गटात सध्या आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली होती आता या टीकेला मनसे नेते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर देत टीका आहे.

अंधारे यांच्या टीकेचा समाचार घेताना गजानन काळे म्हणाले, महाराष्ट्रात वांद्रे मातोश्री येथे असा एक  सोंगाड्या आहे जो सकाळी भगवा, दुपारी हिरवा आणि रात्री सप्तरंगात असतो… तरी बाईला कोण कधी उठतो व कधी झोपतो याचं जास्त पडलंय…, अशा शब्दांत गजानन काळेंनी सुषमा अंधारेंवर टीकास्त्र सोडले आहेत.

वर्षभरात सोंगाड्याचा अनुभव आला की गुळाची ढेप मातोश्रीचा अंधार सोडून दुसऱ्या कळपात दिसली तर नवल वाटायला नको…, असा दावाही त्यांनी केला आहे.दरम्यान, मुलुंड येथे झालेल्या सभेत उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. ऊठ दुपारी अन् घे सुपारी असे म्हणत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली होती.