तेजस्विनी पंडितचे दिग्दर्शक नागराज मंजुळेवर गंभीर आरोप; म्हणाली, ‘नागराज मंजुळेही..’

तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिला मराठी सिनेइंडस्ट्रीतील अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. तिने तिच्या कसदार अभिनयाच्या जोरावर केवळ सिनेमेच नव्हे तर मालिका, वेब सीरिज अशा वेगवेगळ्या माध्यमांत काम केले आहे. तिच्या हटके भूमिकांनीही तिला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. नुकतेच तिने चित्रपट निर्माती म्हणूनही नव्या प्रवासाचा श्रीगणेशा केला आहे. अथांग या मराठीतील पहिल्या नियतकालिक (Periodic) वेब सीरिजची तिने निर्मीती केली आहे.

काही दिवसांपूर्वीच अथांग वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजच्या निमित्ताने तिने अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. यावेळी मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दलही तेजस्विनी स्पष्टच बोलली.

“हिंदी सिनेसृष्टीत किंवा बॉलिवूडमध्ये गटबाजी आहे, याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. पण मराठी सिनेसृष्टीतही कंपूशाही आणि गटबाजी हा प्रकार सुरु झाला आहे. गेल्या काही वर्षांत मी फक्त ठराविक लोकांबरोबरच काम करत आहे, अशी टीका माझ्यावर होते. तीच टीम, तेच कलाकार असं समीकरणच बनलं आहे. काही दिवसांपूर्वी मी फक्त संजय जाधव यांच्याबरोबरच काम करते अशा चर्चाही सुरु होत्या. पण दिग्दर्शकाला काही ठरलेल्या कलाकारांसोबत काम करणं सोपं जातं”, असे ती म्हणाली.

मराठी सिनेसृष्टीतही गटबाजी दिसून येतेय का? यावर बोलताना तेजस्विनी म्हणाली की, “नागराज मंजुळेही (Nagraj Manjule) आकाश ठोसरला त्याच्या चित्रपटांमध्ये घेतोच की… असं काही नाही की फक्त संजय जाधवच कंपूशाही करतात. प्रत्येकाचा वेगळा ग्रुप आहे.”