संजय राऊतांसारखे लोक महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अजून किती खाली नेणार आहेत देव जाणो – मनसे

पुणे – खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या वक्तव्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना उत्तर देण्याऐवजी केलेला थुंकण्याचा केलेला विकृत प्रकार वादात सापडला आहे. याप्रकरणी राजकीय वर्तुळात टीकेची झोड उठवली जात असून महाविकास आघाडीत घटकपक्ष असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक मोठ्या नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी हा प्रकार केल्याने राऊतांच्या कृतीवर टीका होते आहे.

दरम्यान, आता याच मुद्द्यावरून मनसेने संजय राऊत यांना खडेबोल सुनावले आहेत. मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे (Yogesh Khaire) यांनी याबाबत अतिशय संतप्त अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, संजय राऊतांसारखे लोक महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अजून किती खाली नेणार आहेत देव जाणो ! राजकीय विरोधाची वाटचाल व्यक्तीचा द्वेष करण्यापलीकडे नेऊन ठेवत आहेत. त्यांनी थुंकण्यानंतर केविलवाणी सारवासारव केली पण ‘जो बुंद से गयी वो हौद से नही आती’! सुधारा स्वतःला ! असा सल्ला देत खैरे यांनी राऊत यांना झापलं आहे.