खोट्या शपथा घेऊन आई तुळजाभवानीचा अपमान करू नका; Chandrashekhar Bawankule यांचा पलटवार

Uddhav Thackeray, Chandrashekhar Bawankule: मी आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो की, २०१९ मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मुख्यमंत्रीपद प्रत्येकी अडीच वर्षे विभागून देण्याचा शब्द दिला होता, असा खुलासा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला होता. यावर तुम्हीच आमचा विश्वासघात केला, आता किमान देवी देवतांचा विश्वासघात करू नका, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरेंचा समाचार घेतला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू म्हणतच वेळ येताच दगाबाजी करून अविचारी आघाडीच्या मांडीवर बसत मुख्यमंत्रीपद स्वतःच पटकावले. हा सामान्य शिवसैनिकांशी विश्वासघात नाही का? ज्यांनी तुम्हाला भावासारखे प्रेम दिले. त्यांचे तुम्ही फोन घेतले नाहीत. अबोला धरला. दगाबाजी केली. तुम्ही बारामती व दिल्लीसमोर कुर्निंसात करत होते.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची कशाला खोटी शपथ घेता. तुम्हीच दगाबाजी केली! होय, तुम्हीच!! निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभा मोदी, अमित शहा घेत होते, तेंव्हाच हा खुलासा का केला नाही? कारण, काँग्रेस आणि शरद पवार यांच्याशी तुमच्या गोपनीय चर्चा सुरु होत्या. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून होतो. आणि आता कुलस्वामिनीसमोर शपथ घेता?

आता तुमचे पद गेले, पक्ष गेला, निशाणी गेली, विश्वासू माणसेही गेली. हिंदुत्व नासवले, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानावर मूग गिळून बसले, सनातन धर्मावर मिंधे झाले. प्रभू श्रीराम प्रतिष्ठापनेत राजकारण आणले..हाती धुपाटणे आले म्हणून पुन्हा ‘बंद खोलीतील’ रडगाणे सुरु झाले. तुम्ही आमचा विश्वासघात केला, आता किमान देवी देवतांचा विश्वासघात करू नका, असेही त्यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या-

Congress | कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्याच्या कन्येने केला भाजपमध्ये प्रवेश

Congress | ‘महंगाई डायन’ म्हणणाऱ्या भाजपाला आता तीच ‘महंगाई डार्लिंग’ वाटू लागली आहे का? काँग्रेसचा सवाल

तुम्हाला सन्मानाचं पद देऊ,ठाकरेंनी नितीन गडकरींना ऑफर दिल्यानंतर आता सुधीर मुनगंटीवारांची ठाकरेंना ऑफर