खलिस्तानी समर्थकाला कोपरा पासून ढोपरापर्यंत सोलून काढा – राम सातपुते 

मुंबई – मोहालीतील (Mohali) पंजाब पोलिसांच्या गुप्तचर कार्यालयाच्या इमारतीवर रॉकेट हल्ल्याची (Rocket attacks on police intelligence office building) माहिती समोर येत आहे. त्यामुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या स्फोट इतका भयंकर होतो की या स्फोटामुळे इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या स्फोटोबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपासाला सुरूवात केली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

सोमवारी संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास मोहालीतील पंजाब इंटेलिजन्स कार्यालयाबाहेर (Punjab Intelligence Office)  मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळते. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तसंच, कोणतेही नुकसान झालेले नाही. पंजाब पोलिसांच्या इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयाच्या इमारतीवर रॉकेटने हल्ला करण्यात आला. ज्याने सर्वांनाच गोंधळात टाकले आहे. गुप्तचर विभागाची ही इमारत सुहाना साहिब गुरुद्वाराजवळ आहे.

या हल्ल्यावर आता भाजप आमदार राम सातपुते (BJP MLA Ram Satpute) यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, पंजाब च्या मोहाली मध्ये पोलीस गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर रॉकेट सदृश्य बॉम्ब ने हल्ला झाला. खलिस्तानी दहशतवाद्यांचे नाटक खपवून घेणार पंजाब मध्ये केजरीवाल (Kejriwal) च्या आप च सरकार आहे . खलिस्तानी समर्थकाला कोपरा पासून ढोपरापर्यंत सोलून काढा. राष्ट्र सुरक्षा प्रथम असं त्यांनी म्हटले आहे.