पहिल्यांदाच असं होईल रक्षाबंधनाला दीदी नसणार, पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोदी झाले भावूक

मुंबई – गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या ( First Lata Mangeshkar Award ) स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांना आज प्रदान करण्यात आला आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi Speech In Lata Mangeshkar Award Program ) यांनी म्हटले की, मी हा पुरस्कार देशवासीयांना समर्पित करतो. लतादीदी यांचे कार्यदेखील देशवासियांसाठी समर्पित होते. त्यामुळे त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा मी देशाला समर्पित करत आहे. आपल्याला संगीताची शक्ती लतादीदीच्या माध्यमातून बघायला मिळाली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

मोदी म्हणाले, जवळपास चार-साडेचार दशकं झाली असतील, लतादीदींशी माझा परिचय सुधीर फडकेंनी करून दिला होता. तेव्हापासून आजपर्यंत या परिवारासोबतचे अपार प्रेम आणि असंख्य घटना या माझ्या जीवानाचा भाग बनल्या आहेत. माझ्यासाठी लतादीदी स्वरसम्राज्ञी बरोबच जे सांगताना मला गर्व वाटतो, त्या माझ्या मोठ्या बहीण होत्या. त्यांच्याकडून मला नहेमीच मोठ्या बहिण्याचं प्रेम मिळालं. मी समजतो या पेक्षा मोठं आयुष्याचं सौभाग्य काय असू शकतं.

खूप दशकानंतर हा पहिला राखीचा सण असेल जेव्हा दीदी नसेल. मी त्यांचा खूप आदर करायचो, मात्र त्या नेहमी सांगायच्या माणूस आपल्या वयाने नाही तर कार्याने मोठा होतो. जो देशासाठी जेवढं करेल तो तेवढाच मोठा आहे. यशाच्या शिखरावर असताना अशा प्रकारचा विचार पाहिल्यावर आपल्याला त्यांच्या महानतेचा अनुभव येतो. लतादीदी वयाने आणि कर्माने देखील मोठ्या होत्या. लतादीदींनी संगीतात ते स्थान मिळवलं होतं की लोक त्यांना देवी सरस्वतीचं प्रतीरुप मानत होते. त्यांच्या आवाजाने जवळपास ८० वर्षे संगीत जगतात आपला ठसा उमटवला.” असंही यावेळी मोदींनी बोलून दाखवलं.