मुख्यमंत्र्यांना निमंत्रण न देणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान, जितेंद्र आव्हाड मंगेशकर कुटुंबीयांवर संतापले 

मुंबई – गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या नावाने पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ (Lata Mangeshkar Award)सोहळ्याचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या पहिल्याच पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)  यांना सन्मानित करण्यात आलं आहे. पण या पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही. यावर राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड (Minister Jitendra Awhad) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मंगेशकर कुटुंबियावर (Mangeshkar family) टीका केली आहे.

लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याचं मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले. त्यांची ही भूमिका अगम्य आहे. या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पुरस्कार स्वीकरण्यासाठी मुंबईत आले. त्यावेळी त्यांची आणि उद्धव ठाकरे यांची भेट होईल, असा अंदाज लावला जात होता. पण निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्याचं नाव नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाला जाणे टाळले, असा बोललं जात आहे.