Modi Government | नव्याने स्थापन झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा धडाका; आजच करणार कामाला सुरुवात

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचं (Modi Government) खातेवाटप काल जाहीर झालं. यात राजनाथ सिंह यांना संरक्षण, अमित शहा यांना गृह आणि सहकार, निर्मला सीतारामन यांना अर्थ, आणि नितीन गडकरी यांना रस्ते वाहतूक आणि महामार्ग या आधीच्याच मंत्रालयांची जबाबदारी देण्यात आली आहे. पियूष गोयल यांच्याकडं वाणिज्य तसंच एस. जयशंकर यांच्याकडं परराष्ट्र व्यवहार, ही पूर्वीची खाती कायम ठेवण्यात आली आहेत. शिवराजसिंह चौहान यांना कृषी आणि ग्रामीण व्यवहार खातं देण्यात आलं आहे, तर जे. पी. नड्डा आरोग्यमंत्री असतील. अश्विनी वैष्णव यांना यापूर्वीच्या रेल्वे मंत्रालयासह माहिती आणि प्रसारण हे खातं देण्यात आलं आहे. धर्मेंद्र प्रधान- शिक्षण, मनोहरलाल- ऊर्जा, किरण रिजिजू- संसदीय कामकाज, तर अन्नपूर्णा देवी- महिला आणि बालविकास मंत्री असतील.

महाराष्ट्रातले रामदास आठवले यांच्याकडे आधीच्याच सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री पदाचा कार्यभार असेल. प्रतापराव जाधव यांच्याकडं आयुष मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा स्वतंत्र प्रभार तसंच आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाचं राज्यमंत्रीपद सोपवण्यातआलं असून, रक्षा खडसे यांच्याकडं क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री पदाचा कार्यभार तर  यांच्याकडं सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, नव्याने स्थापन झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील (Modi Government) अनेक केंद्रीय मंत्री आज आपला पदभार स्वीकारणार आहेत. यात राजनाथ सिंह, डॉ. एस. जयशंकर, जे. पी. नड्डा, अश्विनी वैष्णव, डॉक्टर मनसुख मांडविया यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत अन्नपूर्णा देवी, गिरीराज सिंह, मनोहर लाल, गजेंद्र सिंह शेखावत, किरेन रिजिजू आणि सीआर पाटील हे देखील आज पदभार स्वीकारणार आहेत. अर्जुन राम मेघवाल आणि डॉ जितेंद्र सिंह हे देखील आज पदभार स्वीकारणार आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप