मणिपूर हिंसाचारात मोदी सरकारची फक्त बघायची भूमिका, शरद पवार यांचा हल्लाबोल

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे त्यामध्ये ते बोलताना म्हणाले की अजूनही माझ्‍या राजकीय निवृत्तीची वेळ आलेली नाही. २०२४ मध्‍ये देशातील चित्र बदलण्‍यासाठी आम्‍ही कष्‍ट करणार आहोत. भाजपाची भूमिका समाजविरोधी आणि फुट पाडणारी आहे. त्यामुळे इंडिया आघाडीकडून भाजपा आणि मोदीं सरकार विरोधात बिहार आणि कर्नाटक या दोन राज्यात देशपातळीवर दोन सभा घेण्यात येतील. याबाबत 1 सप्टेंबरच्या सभेत पुढील रणनीती ठरवण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना म्हणत होते.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की गेल्या आठ-दहा दिवसांपासून मी महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहे. दोन दिवसांपूर्वी सोलापूरच्या सांगोला परिसरात सुमारे 1000 लोकांनी माझी गाडी वेगवेगळ्या ठिकाणी अडवली. पुणे, सातारा आदी ठिकाणचे अनेक कार्यकर्ते मला भेटायला आले. मी उद्या बीडच्या दौऱ्यावर आहे. मी जिल्ह्यात जावो ना जावो लोकं मला साथ देतात हा माझा अनुभव आहे. आम्ही मविआ म्हणून एकत्रित लोकांसमोर जाणार आहोत. महाराष्ट्रातल्या तरुणांनी कोणत्या रस्त्याने जायचे ते ठरवले आहे. त्याचा निकाल २०२४ च्या निवडणुकीत दिसेल असा विश्वास शरद पवार साहेब यांनी व्यक्त केला आहे

शरद पवार यावर सविस्तर बोलताना म्हणाले की, भाजपाची भूमिका समाजविरोधी आणि फुट पाडणारी आहे. इंडिया आघाडीची पुढची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीत भाजपा विरोधात लढण्यासाठी यशस्वी रणनीती बनवणार आहे. इंडिया आघाडी देशपातळीवर दोन सभा घेणार असून याबाबत 1 सप्टेंबर रोजीच्या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात येईल. बिहार आणि कर्नाटकात दोन सभा घेण्यात येणार असून भाजपा आणि मोदींविरोधात जनमत तयार करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले की, भाजपाला लोकांमध्ये तेढ निर्माण करायचा आहे. धर्म आणि समुदायाच्या आधारावर त्यांना लोकांमध्ये फूट पाडायची आहे. भाजपाकडून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सरकार अस्थिर केले आहे. आमच्याकडे अनेक उदाहरण आहेत. केंद्राच्या सत्तेचे गैरवापर करून निवडून आलेली सरकार पाडणे, मध्यप्रदेश कमलनाथ यांचे सरकार पाडले गेले. सत्तेचा वापर करून महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार कसं पाडलं हे सर्वांना माहित आहे. भाजपकडून केंद्रातील सरकारचा गैरवापर करून अनेक राज्यात ईडीच्या धाक दाखवून सरकार पाडण्यात येत आहे असे देखील शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे. मला एका राजकीय नेत्याने म्हटले आहे की राज्यात नेत्यांपेक्षा ईडी जास्त निर्णय घेते असेही सांगितले आहे.

देशातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. जातीय तेढ निर्माण केले जात आहे. दुसरीकडे मणिपूर जळतंय तरी त्यावर बोलायला राज्यकर्ते तयार नाहीत. काल स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी पंतप्रधानांनी तर देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन घेतले असे वाटत होते. ते म्हणाले की मी पुन्हा येईल. ज्या प्रमाणे फडणवीस पुन्हा आले पण खालच्या पदावर. तसेच मोदी देखील येत्या काळात कसे येतील? असे सध्या मला सांगता येणार नाही असेही शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे

शरद पवार बोलताना म्हणाले की, गेल्या 8 ते 10 दिवसांपासून मी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधत आहे. दोन दिवसांपूर्वी सांगोला या ठिकाणी गेलो तेव्हा मला लोकांनी थांबवले सहमतीची भूमिका दाखवली. बारामती, कोल्हापूर, सातारा आणि काल मी औरंगाबादला आलो. काल ना. धो. महानोर यांच्या श्रद्धांजली सभेला हजर राहिलो. तर त्यांच्या महानोरांच्या गावी गेलो होतो. दुसरे एक सहकारी इंजिनिअरींग क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले. प्रताप बोराडे यांच्या श्रद्धांजली सभेला उपस्थित राहणार आहे.

आज देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहेत. त्या भाजपची भूमिका देशातील सर्वसमाजात एकवाक्यता ठेवण्यासाठी अपेक्षित होते. त्याऐवजी ते देशात कटुता कशी वाढेल यासाठी भूमिका घेत आहेत. त्यासाठी आम्ही देशपातळीवर सभा घेतल्या. एक बिहार आणि दुसरी कर्नाटक येथे सभा झाल्या. संयुक्त सभा घेऊन त्याला इंडिया नाव दिले. 31 ऑगस्ट रोजी इंडियाची आघाडीची बैठक होईल. या बैठकीत सामूहिकपणे मोदी सरकारविरोधात लढाई सुरू होईल. समाजामध्ये जातीय तेढ कसे निर्माण होईल असे निर्णय घेतले जात आहेत.

इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. त्या सेंट्रल बोर्ड शिक्षण मंडळाच्या नियंत्रणाखाली या शाळा काम करतात. मार्गदर्शन आणि अभ्यास त्याचे काम या संस्थेने करायचे असते. 10 ऑगस्ट रोजी एक परिपत्रक काढून सांगितले की 14 ऑगस्ट भारत-पाकिस्तान याच्यात फाळणी झाली. त्यावेळी दोन समाजात कटूटता निर्माण झाली. ती कटूता अनेक वर्ष टिकून राहीली.

आता मोदी सरकारच्या अख्यत्यारित असलेल्या सेंट्रल बोर्डाने परिपत्रक काढून फाळणी झाली त्याचा दिवस साजरा करण्याचे आदेश दिले. फाळणीच्या प्रदर्शन हे ठिकठिकाणी केले पाहिजे. त्यासंबंधीचे चित्र, भीती दाखवली पाहिजे. हे प्रदर्शन करून त्याचे महत्त्व कळावे म्हणून एक कार्यक्रम घ्या. स्वातंत्र्य सेनानी त्यांना कथाकथानासाठी निमंत्रित करा. मीडिया याना निमंत्रित करू नये. त्यासाठी कालावधी निश्चित करा. त्यातून फाळणीतून प्रदर्शन करून लोकांपर्यंत पोहोचवा. ज्या आम्ही सातत्याने सांगतो, समाजामध्ये कटुता वाढवते, जाती धर्मामध्ये त्याचे हे परिपत्रक उदाहरण आहे. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि आम्ही इंडियाच्या बैठकीत हा विषय मांडून निषेध घेण्याचा निर्णय घेतला जाईल.

मणिपूरमध्ये काय घडलं ही भूमिका आम्ही संसदेत मांडली. आज नॉर्थ ईस्ट हा सर्व भाग देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे. चीनची सीमा असल्याने अधिक काळजी घेण्याची गरज आहे. नॉर्थ ईस्ट घडतात किंवा घडवल्या जातात त्या देशाच्या एक्याच्या दिशेने घातक आहेत. मणिपूरमध्ये दोन समाजात अंतर वाढले की समाज एकमेकांविरूद्ध संघर्ष चालू आहे. पोलिंसावर हल्ले केले जात आहेत. त्यावर केवळ सुरुवातीला तीन मिनीट मोदी बोलले. आणि संसदेत केवळ दहा मिनिटं बोलून हा विषय बाजूला केला. हा विषय त्यांना महत्त्वाचा वाटत नाही. मणिपूरमध्ये स्त्रीयांच्या अब्रुची धिंड काढल्या जातात. याकडे मोदी सरकार केवळ बघ्याची भूमिका आहे. त्यामुळे इंडियाच्या बैठकीत आम्ही निर्णय घेऊ.

महाविकास आघाडीत काँग्रेस व ठाकरे गटाचा प्लँन सुरू आहे, याची चर्चा असु शकते, परंतु ती वस्तुस्थिती नाही. माझी आताही तीच भुमिका आहे. असं म्हणत शरद पवारा साहेबांनी आपल्या भुमिकेवर ठाम राहिले आहे. येवल्यानंतर शरद पवारा साहेबांची बीडमध्ये १७आँगस्ट रोजी सभा होत आहे. त्यानंतर २७ आँगस्ट रोजी अजित पवार उत्तर सभा घेणार आहेत. त्यावर आपल्या देशात लोकशाही आहे. कोणालाही सभा घेण्याचा अधिकार आहे. परंतु त्यांनी सध्याची भुमिका का घेतली आहे. ते त्यांनी जनतेला सांगावं असंही शरद पवारा साहेबांनी सांगितले. महाराष्ट्रातील जनतेने ठरवलं आहे की कोणत्या दिशेने जावं. त्याचा निकाल आगामी काळातील निवडणुकांमधून दिसून येईल. काही जिल्ह्यात मी जावो अथवा न जावो. लोक मला साथ देतातच. असंही शरद पवारा साहेबांनी यावेळी सांगितले आहे सध्या जे काही भाजपचं राज्यात सुरू आहे. त्यावर लोक सत्ताधाऱ्यांना उत्तर देतील असंही शरद पवार साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बोलताना म्हणाले की माझ्या आयुष्यात मी १४ निवडणूका लढलो आहे. मला लोकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. चिन्हापेक्षा आम्ही प्रामाणिक काम केलं म्हणून हे शक्य झालेलं आहे. त्यामुळे मला चिन्हाची चिंता नाही पण सत्तेचा गैरवापर करु नये असं माझं मत आहे. सध्या निवडणूक आयोग स्वत: निर्णय घेत नाही. निवडणूक आयोगाने जर स्वत: निर्णय दिला तर मला चिंता नाही. शिवसेनेबाबतच्या निर्णयावर केंद्राने हस्तक्षेप केला होता. त्यामुळे आयोगात ठाकरेंसोबत जे झालं ते आमच्यासोबत देखील होऊ शकतं असेही शरद पवार साहेब यांनी यावेळी म्हटले आहे

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, पवार कुटुंबात मी वडिलधारा असल्याने माझा सल्ला आजही घेतला जातो. ती गुप्त भेट नव्हती. मी भेटीनंतर काच खाली करून फुले स्वीकारून पुढे गेलो होतो. अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आम्ही राजकीय चर्चा केलीच नाही. माझ्याशी कोण चर्चा करणार आहे. ज्या पक्षात हे सर्व नेते होते त्या पक्षाचा संस्थापक कोण आहे. त्या पक्षाचा वरिष्ठ व्यक्ती कोण आहे. यात आणखी कुणी चर्चा करायला येईल असं म्हणण्याचं काही कारण नाही. त्याला कुणीही महत्त्व देण्याचं काहीही कारण गरज नाही असे शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे

तसेच सत्तेचा गैरवापर आज होत आहे. केरळमध्ये भाजपा नाही, तामिळनाडूत नाही, कर्नाटकात नाही. आंध्र प्रदेशात भाजपा नाही. तेलंगणात नाही. महाराष्ट्रात भाजपा सरकार कसे आले हे सगळ्यांना माहिती आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार पाडून आले. राजस्थानात, दिल्ली, पंजाब, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये भाजपा नाही. मी पुन्हा येईन असं कितीही म्हटलं तरी देशात वेगळे चित्र दिसेल यात शंका नाही असेही शरद पवार साहेब यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.