भाजप उमेदवाराने अजितदादांचाही रेकॉर्ड मोडला, देशात सर्वाधिक मतांनी निवडून आला ‘हा’ आमदार

लखनौ – उत्तर प्रदेशातील भाजपच्या एका उमेदवाराने तर तब्बल 1 लाख 79 हजार मतांनी जिंकून विजयाचा एक नवा रेकॉर्ड उभा केला आहे. नोएडामधील भाजपच्या या उमेदवाराचं पंकज सिंह (Pankaj Singh) असं नाव आहे. ते (Noida) मतदारसंघातून निवडून आले आहेत. पंकज सिंह यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजय मिळवला आहे.

विशेष म्हणजे त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा रेकॉर्ड मोडला आहे. अजित पवार यांनी 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 1 लाख 65 हजार मतांनी विजय मिळवला होता. इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून येणारे अजित पवार हे देशातील पहिले आमदार होते. पण पंकज सिंह यांनी त्यांचाही रेकॉर्ड मोडला आहे.

पंकज सिंह यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार सुनील चौधरी यांचा पराभव करत मोठं यश संपादित केलं आहे. तसेच बसपाकडून कृपाराम शर्मा हे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर काँग्रेसकडून पंखुडी पाठक नावाच्या उमेदवार होत्या. पाठक यांच्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या स्वत:च्या त्यांच्या निवडणुकीचा प्रचार केला होता. पण त्याचा फार काही फायदा झालेला नाही.