लाईव्ह कार्यक्रमात पाकिस्तानी क्रिकेटरची विराटवर जहरी टीका, कोहलीला म्हणाला ‘स्वार्थी’

Virat Kohli Selfish: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) सध्या तुफान फॉर्मात आहे. त्याने चालू वनडे विश्वचषक २०२३ मध्ये (World Cup 2023) दमदार खेळी केल्या आहेत. नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या साखळी सामन्यात विराटने शानदार शतक झळकावत संघाला २४३ धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाचू भूमिका बजावली होती. मात्र त्याने शतकाला १२१ चेंडू घेतल्याने सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज (Mohammad Hafiz) याने विराटला स्वार्थी म्हटले आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार हाफिजने ‘गेम ऑन’ या पाकिस्तानी टीव्ही चॅनलवर बोलताना विराटवर टीका केली. “मी विराटच्या फलंदाजीमध्ये स्वार्थीपणा पाहिला आहे. विश्वचषकात त्याने तिसऱ्यांदा स्वार्थी खेळी केली आहे. विराटने त्याचे ४९ वे शतक पूर्ण करण्यासाठी एक धाव घेतली. त्याने त्यावेळी त्याच्या शतकाला संघापेक्षा जास्त महत्त्व दिले. संघाच्या गरजेला त्याने समजून घेतले नाही,” असेही हाफिजने म्हटले.

भारतीय कर्णधार रोहित शर्माचं कौतुक करताना हाफिज म्हणाला, “रोहितही (Rohit Sharma) स्वार्थी खेळ करू शकला असता. परंतु त्याने असे केले नाही. तो संघाला वरती ठेवतो, स्वत:ला नाही. रोहितही शतक करू शकला असता, परंतु त्याने नेहमी संघाला स्वत:पेक्षा वर ठेवले आहे.”

महत्वाच्या बातम्या-

उद्योग वाढीसाठी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाची धावपट्टी विकसित करा- आ. किशोर जोरगेवार

ठग सुकेशला अयोध्या मंदिरात दान करायचा आहे 11 किलो सोन्याचा मुकुट, तुरुंगातून लिहिलेले पत्र

न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचणार का? जाणून घ्या समीकरण