दिवाळीला राशीनुसार ‘या’ रंगाची साडी घालत दिसा ग्लॅमरस, प्रत्येकाची नजर तुमच्यावर खिळेल!

Diwali 2023: दिवाळीच्या पार्टीसाठी (Diwali Party) काय परिधान करावे हे ठरवणे खूप कठीण आहे. आपल्या सर्वांना असा ड्रेस निवडायचा असतो ज्यामध्ये आपण सर्वात सुंदर आणि स्टाइलिश दिसतो. तुम्ही कोणताही ड्रेस घालू शकता, पण साडीची बातच न्यारी असते. पारंपारिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या साडीमध्ये तुम्ही स्टाईल करू शकता. त्यात ट्विस्ट आणण्यासाठी तुम्ही तुमच्या राशीच्या रंगानुसार साडी घालू शकता. असे मानले जाते की राशीच्या रंगानुसार कपडे परिधान केल्याने तुम्हाला सुख आणि समृद्धी मिळते. अशाप्रकारे, तुम्ही तुमची साडी फ्लॉंट करू शकाल आणि कोणास ठाऊक, तुमच्यावर आनंदाचा वर्षाव होऊ शकतो.

मेष
मेष राशीचा शुभ रंग लाल आहे. त्यामुळे या दिवाळीत तुम्ही लाल रंगाची साडी नेसू शकता. लक्ष्मीलाही लाल रंग खूप प्रिय आहे, तिच्या पूजेत लाल रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. लाल साडी स्टाईल करण्यासाठी, तुम्ही अभिनेत्री कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लूकवरून कल्पना घेऊ शकता.

तूळ
या राशीच्या लोकांसाठीही लाल रंग शुभ मानला जातो. त्यामुळे लाल साडी नेसून ते आपली दिवाळी अधिक रंगतदार करू शकतात.

वृश्चिक
या राशीसाठी लाल देखील शुभ रंग मानला जातो. लाल रंगाच्या साडीसोबत स्टायलिश ब्लाउज घालून तुम्ही तुमचा लुक वाढवू शकता.

मिथुन
मिथुन राशीसाठी पिवळा शुभ रंग मानला जातो. त्यामुळे दिवाळीनिमित्त पिवळ्या रंगाची साडी नेसता येते. पिवळा रंग गणपतीला खूप प्रिय आहे, त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर हा रंग परिधान करणं आणखी खास होईल.

मीन
मीन राशीसाठीही पिवळा रंग शुभ मानला जातो. पिवळ्या रंगाबरोबरच तुम्ही जांभळ्या रंगाचे कानातले आणि अंगठ्या घालू शकता, जे तुमच्या साडीच्या रंगाशी कॉन्ट्रास्ट करेल आणि संपूर्ण लुक वाढवेल.

धनु
या राशीच्या लोकांसाठी पिवळा रंग शुभ मानला जातो. त्यामुळे तुम्हीही धनु राशीचे असाल तर दिवाळीला पिवळ्या रंगाची साडी नेसता येईल. पिवळ्या साडीसोबत गजरा तुम्हाला छान दिसेल.

वृषभ
वृषभ राशीचा रंग पांढरा आहे. या राशीच्या महिला पांढऱ्या रंगाची साडी घालू शकतात. पांढऱ्या रंगाची फ्लोरल पॅटर्नची साडी एकदम ग्लॅमरस दिसेल.

कर्क 
या राशीच्या लोकांसाठी पांढरा रंग शुभ मानला जातो. पांढऱ्या रंगाची सिक्विन साडी तुमच्या लूकमध्ये आकर्षण वाढवू शकते.

सिंह
सिंह राशीसाठी सोनेरी रंग शुभ मानला जातो. गोल्डन कलर तुमचा लुक वाढवू शकतो आणि तो खूप ट्रेंडी देखील दिसेल.

कन्या
हिरवा हा कन्या राशीचा शुभ रंग मानला जातो. या राशीचे लोक हिरवी साडी आणि न्यूड मेकअप लुकने दिवाळी उजळून टाकू शकतात.

मकर
या राशीचा रंग निळा मानला जातो. निळा रंग खूप सुंदर दिसतो. त्यामुळे या दिवशी तुम्ही निळ्या रंगाच्या साडीसोबत सोनेरी दागिने घालू शकता.

कुंभ
कुंभ राशीसाठी आकाशी रंग शुभ मानला जातो. या दिवशी तुम्ही स्काय ब्लू कलरची साडी आणि वेव्ही केस लुकने ग्लॅमर पसरवू शकता.

महत्वाच्या बातम्या-

उद्योग वाढीसाठी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाची धावपट्टी विकसित करा- आ. किशोर जोरगेवार

ठग सुकेशला अयोध्या मंदिरात दान करायचा आहे 11 किलो सोन्याचा मुकुट, तुरुंगातून लिहिलेले पत्र

न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचणार का? जाणून घ्या समीकरण