अजितदादांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही निर्णय घेतला तो जनतेच्या विकासासाठी घेतला – Sunil Tatkare

Sunil Tatkare  – तपास यंत्रणांच्या भीतीने आम्ही भाजपसोबत गेलो अशी टिका ज्यांच्याकडे बहुमत नाही अशा पक्षाकडून करण्यात आली मात्र आम्ही जो निर्णय घेतला तो जनतेच्या विकासासाठी घेतला अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

निर्धार नवपर्वाचा ही भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पूर्व विदर्भातील सहा जिल्हयात या अभियानाला सुरुवात केली असून दौऱ्याच्या दुसर्‍या दिवशी (सोमवारी) भंडारा येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला.

जातीय वादी पक्षासोबत गेलो अशी सोयीस्कर टिका आमच्यावर केली गेली. जर कॉंग्रेस जातीयवादी पक्षासोबत जाऊ शकते तर आम्ही तर याअगोदर भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर केला आणि आता तर भाजपसोबत गेलो तर आम्ही जातीयवादी कसे असा सवालही सुनिल तटकरे यांनी उपस्थित केला.

अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नवे पर्व सुरू केले आहे. ‘घड्याळ तेच वेळ नवी’ हे आजच्या ग्रामपंचायत निवडणूकीत मिळालेल्या यशानंतर सिद्ध झाले आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले. तुमच्या जिल्हयातील धान खरेदी दिवाळीपूर्वी पूर्ण झाली पाहिजे. यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून हा प्रश्न निकाली काढला जाईल असे आश्वासनही सुनिल तटकरे यांनी दिले.

एक हजार रुपये बोनस शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे आणि ती पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही असा शब्दही सुनिल तटकरे यांनी दिला. सर्व समाजाला सर्व घटकांना न्याय कसा देता येईल असा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून सोडवला जाईल. नवे पर्व सुरू करण्यासाठी अजितदादांच्या नेतृत्वाखाली हा धाडसी निर्णय घेतला गेला.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्हावर निवडणूकांना सामोरे जाण्याचा मला विश्वास आहे. काहीजण पेपर फुटला अशी टिका करत आहेत परंतु पेपर फुटलेला नाही. दोन लाख २५ हजार लोकांनी आपल्यावर विश्वास व्यक्त करत शपथपत्र दाखल केली आहेत असेही सुनिल तटकरे म्हणाले. भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी आहे आणि तो प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली आणखी भक्कमपणे उभा राहिला पाहिजे असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

या मेळाव्याला अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, माजी खासदार मधुकर कुकडे, आमदार मनोहर चंद्रीकापुरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, निरीक्षक राजेंद्र जैन, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे, सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे,भंडारा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे,भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील पुंडे,प्रदेश सरचिटणीस धंनजय दलाल, जयवंत वैरागडे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सरिता मदनकर,रवींद्र वानखेडे,राजु माटे ,नरेंद्र झंझाड,हेमंत महाकाळकर,विजय सावरबांधे, युवक जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष स्वप्निल नशिने,नागपुर विभागीय युवक अध्यक्ष निखिल ठाकरे,विद्यार्थी आघाडीचे विदर्भप्रमुख माधुरी पालीवाल,विद्यार्थी प्रदेश सरचिटणीस विशाल विहिरे (Food and Drug Administration Minister Dharmarav Baba Atram, Former MP Madhukar Kukde, MLA Manohar Chandrikapure, Women State President Rupalitai Chakankar, Inspector Rajendra Jain, Youth State President Suraj Chavan, Students State President Prashant Kadam, OBC Cell State President Kalyan Akhade, State Coordinator Ishwar Balbudhe, Social Justice Cell State President Sunil Magre, Bhandara District President Nana Panchbudhe, Bhandara District Central Bank President Sunil Punde, State General Secretary Dhanjay Dalal, Jaywant Vairagade, Women’s Alliance District President Sarita Madankar, Ravindra Wankhede, Raju Mate, Narendra Zanjad, Hemant Mahakalkar, Vijay Savarbandhe, Youth District President Yashwant Sonkusre. Student District President Swapnil Nashin, Nagpur Regional Youth President Nikhil Thackeray, Vidarbha President of Student Union Madhuri Paliwal, Student Region General Secretary Vishal Vihere) आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

उद्योग वाढीसाठी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाची धावपट्टी विकसित करा- आ. किशोर जोरगेवार

ठग सुकेशला अयोध्या मंदिरात दान करायचा आहे 11 किलो सोन्याचा मुकुट, तुरुंगातून लिहिलेले पत्र

न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचणार का? जाणून घ्या समीकरण