सामनावीर बनल्यानंतर मोहम्मद शमी झाला भावूक, म्हणाला, तुमचे सहकारी … 

Mohammed Shami : – आयसीसी पुरुषांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत काल धरमशाला इथं झालेल्या चुरशीच्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. आरंभी फलंदाजी करताना न्यूझीलंडनं सर्वबाद 273 धावा केल्या. यामध्ये डेरील मिचेलच्या 130 धावांचा समावेश होता. भारताकडून मोहम्मद शामीनं 54 धावांमध्ये 5 गडी बाद केले. अर्थातच तो सामनावीर ठरला. भारतानं 274 धावांचं उद्दिष्ट सहा गडी गमावून अठ्ठेचाळिसाव्या षटकात पार केलं. विराट कोहलीनं 95 धावा केल्या. त्यामुळे भारताचा विजय दृष्टीपथात आला. मात्र, त्याचं शतक हुकलं.

या सामन्यात टीम इंडियाने 20 वर्ष जुना विक्रम मोडला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे भारतीय संघाने 48 षटकात पूर्ण केले. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला त्याच्या शानदार गोलंदाजीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला.

सामनावीर ठरल्यानंतर मोहम्मद शमीने विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यातील त्याची गोलंदाजी आणि संघाच्या खेळाच्या संयोजनाविषयी बोलताना सांगितले की, मला खूप आज गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर विकेट मिळाल्याने आत्मविश्वास मिळाला . तुमचे सहकारी चांगले प्रदर्शन करत असतील, तर तुम्ही त्यांना पाठिंबा द्यावा, संघाने चांगली कामगिरी करणे महत्त्वाचे आहे, हे मला समजते.शेवटच्या षटकांमध्ये विकेट घेणे महत्त्वाचे होते , तुमचा संघ नेहमीच अव्वल असावा असे तुम्हाला वाटते. मला हे विकेट मिळाल्याने खूप आनंद झाला आणि भारत गुणतालिकेत अव्वल आहे.

https://www.youtube.com/watch?v=kopoxXcWP-M

महत्वाच्या बातम्या-

फिनिक्स मॉल ते वाघोली दरम्यान एकात्मिक उड्डाणपूल व मेट्रोसाठी डीपीआर करा – अजित पवार

कमाल, लाजवाब! कोहलीच्या ‘विराट’ खेळीमुळे भारताने २० वर्षांनंतर न्यूझीलंडला विश्वचषकात केले पराभूत

राज्य सरकारच्या जाहिरातीवर चव्हाणांचा हल्लाबोल; मराठा आरक्षणासाठी संसदेत घटनादुरुस्ती करण्याची मागणी