Suryakumar Yadav Run out : विराट कोहली निघाला स्वार्थी, जाणूनबुजून शतकासाठी सूर्याला धावबाद केले

India vs New Zealand, Suryakumar Yadav Run out: वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सामना पार पडला. धरमशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना झालेला हा सामना भारताने ४ विकेट्सने जिंकला.या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर 274 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने भारताला चांगल्या सुरुवातीनंतरही चांगलाच संघर्ष करायला लावला. यावेळी भारताने केएल राहुलच्या रुपात ३३ व्या षटकात १८२ धावा असताना चौथी विकेट गमावली होती.

त्यामुळे सूर्यकुमार यादव पहिलाच वर्ल्डकप सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. मात्र, तो  ३४ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर धावबादच्या रुपात केवळ २ धावांवर  बाद झाला. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी उत्कृष्ट होती मात्र सतत विकेट पडल्यामुळे न्यूझीलंडने सामन्यात पुनरागमन केले.

27 धावा करून यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल बाद झाल्यानंतर विश्वचषकातील आपला पहिला सामना खेळणारा सूर्यकुमार यादव क्रीझवर फलंदाजीला आला. मात्र त्याची फलंदाजी फार काळ टिकू शकली नाही आणि केवळ दोन धावा करून तो धावबाद झाला. मात्र, विराट कोहलीच्या चुकीमुळे सूर्यकुमार यादवची विकेट गेली, असे अनेक चाहत्यांचे मत आहे.काहींनी विराटची बाजू बरोबर असल्याचे देखील म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

कंत्राटी भरतीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच – Dhananjay Munde

Mahua Moitra : अदानींना टार्गेट करण्यासाठी महुआ मोइत्राचा वापर करण्यात आला – दर्शन हिरानंदानी

चंद्रपूरच्या विकासासाठी येणा-या प्रश्नांना प्राधान्य देणार – राहुल नार्वेकर