राजकीय नेत्यांनीही साजरा केला भारताचा न्यूझीलंडवरील शानदार विजय, मोदी-शहांकडून संघाला शुभेच्छा

Ind vs Nz – आयसीसी पुरुषांच्या विश्वकरंडक क्रिकेट (ICC World Cup 2023) स्पर्धेत काल धरमशाला इथं झालेल्या चुरशीच्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. आरंभी फलंदाजी करताना न्यूझीलंडनं सर्वबाद 273 धावा केल्या. यामध्ये डेरील मिचेलच्या 130 धावांचा समावेश होता. भारताकडून मोहम्मद शमीनं (Mohammad Shami) 54 धावांमध्ये 5 गडी बाद केले. अर्थातच तो सामनावीर ठरला. भारतानं 274 धावांचं उद्दिष्ट सहा गडी गमावून अठ्ठेचाळिसाव्या षटकात पार केलं. विराट कोहलीनं (Virat Kohli) 95 धावा केल्या. त्यामुळे भारताचा विजय दृष्टीपथात आला. मात्र, त्याचं शतक हुकलं.

आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघानं काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संघाचं अभिनंदन केलं आहे. प्रत्येकानं योगदान दिलेला आणि सांघिक प्रयत्नांचा उत्तम आविष्कार असलेला असा हा विजय होता. भारतीय संघाचं कौशल्य आणि समर्पित भावनेनं केलेला खेळ हे अतुलनीय होतं, असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवर लिहिलेल्या आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी विराट कोहली याचं विशेष अभिनंदन केलं आहे. विराटच्या हुकमी खेळीनं सामन्यात चमक आणली. विश्वकरंडक जिंकण्याच्या  वाटचालीत संपूर्ण भारत आपल्या शुभेच्छांसह कोहली आणि भारतीय संघाच्या पाठीशी उभा आहे, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आज पाकिस्तान आणि अफगाणीस्तान दरम्यान सामना होणार आहे.

https://youtu.be/998aRUPfTUs?si=DPll8YgZEcjawCcs

महत्वाच्या बातम्या-

फिनिक्स मॉल ते वाघोली दरम्यान एकात्मिक उड्डाणपूल व मेट्रोसाठी डीपीआर करा – अजित पवार

कमाल, लाजवाब! कोहलीच्या ‘विराट’ खेळीमुळे भारताने २० वर्षांनंतर न्यूझीलंडला विश्वचषकात केले पराभूत

राज्य सरकारच्या जाहिरातीवर चव्हाणांचा हल्लाबोल; मराठा आरक्षणासाठी संसदेत घटनादुरुस्ती करण्याची मागणी