‘दसऱ्याच्या आधी उद्धव ठाकरेंना याकूबच्या कबरीला मजार बनवण्याचं कारण जनतेला द्यावं लागेल’

मुंबई – दहशतवादी याकूब मेमनच्या (Terrorist Yakub Memon) कबरीचं सुशोभीकरण करून त्यावर रोषणाई करण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या गंभीर प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरु झाले आहे. भाजप आणि शिंदे गट (BJP and Shinde group) महाविकास आघाडीवर अक्षरशः तुटून पडला आहे तर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) देखील या आरोपांना आणि टीकेला प्रत्युत्तर देत आहे.

आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असतानाच आता भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला आव्हान दिलंय. सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेला दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवरून त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. दसऱ्याच्या आधी उद्धव ठाकरेंना याकूब मेमनच्या कबरीला मजार बनवण्याचं कारण जनतेला द्यावं लागेल, असं मोहित कंबोज म्हणाले आहेत. त्यामुळे आता या सगळ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेना काय उत्तर देणार हे पाहाणं महत्वाचं असेल.