पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात सुप्रिया सुळेंचंही मत सकारात्मक – मिटकरी 

 Beed – भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडे या भाजपामध्ये अस्वस्थ असून त्या लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देतील असं मिटकरींनी म्हटलं आहे. तसेच त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या तर त्यांचं स्वागतच असल्याचं सूचक विधानही मिटकरींनी केलं आहे.

मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की मी त्या मुद्द्यावर ठाम आहे. पंकजाताईंना डावलण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीमध्ये सुरु आहे. तो प्रयत्न फडणवीस सरकारकडून सातत्याने होतो आहे. आतापर्यंतही त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली गेलेली नाही. त्या गोपीनाथराव मुंडेसाहेबांच्या कन्या आहेत. तोलामोलाच्या नेत्या आहेत. त्या महाराष्ट्रातील वजनदार नेत्या आहेत. पण आतापर्यंतही त्यांना न्याय मिळालेला नाही. म्हणूनच त्या अस्वस्थ आहेत. माझा विश्वास आहे की पंकजाताई लवकरच मोठा निर्णय घेतील,” असं उत्तर दिलं.विशेष म्हणजे पंकजा यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंचंही मत सकारात्मक असल्याचे संकेत मिटकरींनी दिले आहेत.

पंकजा मुंडे यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न मागील काही वर्षात सुरू आहे – जयंत पाटील

पंकजा  मुंडे यांना भाजप म्हणावे तितके महत्त्व देत नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यांना थोडंसं बाजूला काढण्यात आले आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजप वाढवण्यासाठी मोठे कष्ट घेतले. मुंडे साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, पंकजाताई मुंडे यांनाही तो वर्ग पाठिंबा देतो. त्यामुळे त्यांचे महत्त्व कमी करण्याचे काम मागील काही वर्षात सुरू आहे म्हणून त्यांनी आपले मत खंत म्हणून व्यक्त केले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.