MS Dhoni Video | भल्याभल्या गोलंदाजांना धोनीने दाखवले आस्मान, वादळी खेळीचा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहावा असा

MS Dhoni Video | रविवारी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघ दिल्ली कॅपिटलविरुद्ध पराभूत झाला. असे असूनही, सीएसकेच्या चाहत्यांना पराभवाचा त्रास झाला नाही. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याच्या धडाकेबाज खेळीने चाहत्यांचे हृदय जिंकले. माहीने पुन्हा एकदा विशाखापट्टणममध्ये वादळी खेळी (MS Dhoni Video) केली. या मैदानावर, त्याने 2005 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 148 धावांचा स्फोटक डाव खेळला होता. आता 19 वर्षांनंतर पुन्हा त्याने याच मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला.

धोनीने येताच गोलंदाजांना धू धू धुतले
धोनी 17 व्या षटकात फलंदाजीसाठी आला. जेव्हा तो क्रीझवर आला, तेव्हा संघाला 23 चेंडूवर 72 धावांची गरज होती. तो येताच त्याने मुकेश कुमारचा चेंडू समीबाहेर मारला. दुसर्‍या चेंडूवरील त्याचा झेल खलील अहमदने सोडला. या षटकांच्या शेवटच्या बॉलवर, धोनीने चेंडूला सीमेवरुन बाहेर पाठवले आणि चौकार खात्यात जोडला. त्यानंतर १८व्या षटकातील पाचव्या चेंडूवर धोनीने खलील अहमदला षटकार ठोकला. या आयपीएल हंगामातील धोनीचा हा पहिला षटकार होता.

शेवटच्या षटकात एन्रिच नॉर्कियाचा समाचार घेतला
शेवटच्या षटकात चेन्नईला 41 धावा लागत होत्या. धोनी क्रीझवर होता. येथून सामना जिंकणे अशक्य होते. असे असूनही, धोनीने धैर्य गमावले नाही आणि चाहत्यांचे मनोरंजन केले. त्याने एन्रिच नॉर्कियाच्या चेंडूवर दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले. त्याने षटकारासह डाव संपवला. 16 चेंडूवर 37 धावा केल्यानंतरही धोनी बाद झाला नव्हता. त्याने 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले. या डावादरम्यान धोनीचा स्ट्राइक रेट 231.25 होता.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका