IPL 2024 | ‘कळलंच नाही की …’ माहीच्या वादळी फलंदाजीवर पत्नी साक्षीची मजेदार प्रतिक्रिया

Sakshi Singh On MS Dhoni Batting | रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल 2024 (IPL 2024) सामन्यादरम्यान महेंद्रसिंग धोनी जुन्या लयमध्ये दिसला. चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) साठी खेळताना, व्हिंटेज धोनीची झलक दिसली. धोनीचा संघ जिंकू शकला नाही, तरी त्याने काही शानदार शॉट्स लावून जुन्या काळातील धोनीची चाहत्यांना आठवण करून दिली. दिल्ली कॅपिटलने 20 धावांनी हा सामना जिंकला आणि या हंगामात प्रथम विजय नोंदविला. त्याच वेळी, ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात सीएसकेला दोन सामने जिंकल्यानंतर प्रथम पराभवाचा स्वाद घ्यावा लागला.

या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि रिषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने 191 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, चेन्नई 20 षटकांत सहा विकेट गमावत केवळ 171 धावा करू शकला. या हंगामात धोनी प्रथमच फलंदाजीसाठी उतरला आणि त्याने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आणि चाहत्यांमध्ये उर्जा भरली. आठवा क्रमांकावर उतरलेल्या धोनीने 16 चेंडूंचा सामना केला आणि 37 धावांचा शानदार डाव खेळला. धोनीने पहिल्या चेंडूवर क़डक चौकार मारला. एकंदरीत, धोनीच्या फलंदाजीदरम्यान चार चौकार आणि तीन षटकार निघाले. या काळात धोनीने रवींद्र जडेजाबरोबर 51 धावांची भागीदारी केली, परंतु सीएसकेला विजयासाठी या धावा पुरेशा नव्हत्या.

माहीच्या वादळी डावांवर त्याची पत्नी साक्षी सिंगची प्रतिक्रिया आली, जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धोनीला त्याच्या वादळी खेळीसाठी मॅचचा इलेक्ट्रिक स्ट्रायकर हा पुरस्कार देण्यात आला. साक्षी सिंगने माहीचा ट्रॉफीसह इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि लिहिले, “हाय धोनी! आपण कधी हा सामना गमावला (IPL 2024) हे कळलेच नाही.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका