इम्तियाज जलील यांचे ठाकरेंबद्दल उद्गार ऐकून शिवसैनिकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहतील!

संभाजीनगर – शिवसेना फुटीला मराठी मनांवर आघात झाला असून उद्धव ठाकरे यांच्याबाबत मला सहानुभूती वाटते, असं वक्तव्य AIMIM पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे. मला उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल प्रचंड सहानुभूती वाटतीये. कारण शेवटी मी पण एक मराठी माणसू आहे आणि शिवसेनेची ओळख मराठी माणसांसाठी लढणारी ढाल म्हणून आहे. पण भाजपने शिवसेना फोडण्याचं पाप करायला नको होतं, असे उद्गार इम्तियाज जलील यांनी काढले आहेत.

शिवसेनेच्या फुटीचा केवळ राजकारण्यांवर परिणाम झाला नाही तर मराठी मनांवर त्याचा आघात झालाय. शिवसेनेमधलं हे बंड खरंच दुर्दैवी आहे. महाराष्ट्राने कधीही एवढ्या घाणेरड्या पातळीचं राजकारण पाहिलं नव्हतं, जे आज आपल्याला बघायला मिळतंय. असं जलील यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

राजकारण काहीही असू द्या, शिवसेनेसोबत आमचे मतभेद आहेत आणि राहतीलही… मराठी अस्मिता शिवसेनेशी जोडलेली होती. मराठी माणसासाठी ढाल म्हणून शिवसेना कायम उभी होती. याच मराठी माणसाला फोडण्यासाठी आज भाजपकडून-अमित शाहांकडून जी परिस्थिती निर्माण करण्यात आलेली आहे, खरंच त्याबद्दल मला वाईट वाटतं", अशा देखील भावना इम्तियाज जलील यांनी व्यक्त केल्या आहेत.