ईडीने बातमी देण्याऐवजी मुलुंडचा पोपटलाल बातम्या जाहीर करतो; संजय राऊतांची टीका

Hasan Mushrif ED Raid Updates : आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याभोवती ईडीने फास आणखी आवळला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने तिसऱ्यांदा छापेमारी केली आहे. सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना काल ईडीने अटक केली आहे.

याच पार्श्वभूमीवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल ईडीचे अधिकारी खेडला गेले आणि कदम यांना अटक केली. त्यांना अटक केल्याची बातमी ईडीने देण्याऐवजी मुलुंडचा पोपटलाल जाहीर करतो. तसेच हसन मुश्रीफांवरील एफआयआरची कॉपी सर्व प्रथम सोमय्यांना मिळते. याचा अर्थ नेमका काय? कदम यांना काल अटक झाली. मात्र, त्यांच्या अटकेआधी त्यांना अटक होणार हे आमचे मुलुंडचे पोपटलाल बोलत होते. या सर्व प्रकारावरुन संजय राऊत यांनी सोमय्यांवर (Kirit Somaiya) हल्लाबोल केला आहे.