औरंगाबादमध्ये पुरोहिताची हत्या, पोलिसांकडून तपास सुरु

औरंगाबाद – औरंगाबादच्या (Aurangabad) वैजापूरमध्ये पुरोहिताची हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैजापूर हरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्प परिसरात मंदिरात पौरोहित्य करणाऱ्या 55 वर्षीय पुरोहिताची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुरोहिताच्या हातासह डोक्यावर मारहाणीच्या खूणा दिसून आल्या, तसेच घटनास्थळी रक्ताचे डाग आढळून आले. कैलाश गणपत चव्हाण (रा. बुरुडगाव रोड, भोसले आखाडा, अहमदनगर) असे खून झालेल्या पुरोहिताचे नाव आहे. पुरोहिताचा खून कुणी, कशासाठी व का केला? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.