बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या गौरी भिडे कोण आहेत ?

Mumbai – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी गौरी भिडे यांनी याचिकेमार्फत मुंबई उच्च न्यायालयाके केलीय. या याचिकेवरची सुनावणी गुरुवारी (8 डिसेंबर) पार पडली. सदर याचिकेची दखल घेत प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे.

सामना आणि मार्मिकच्या विक्रीतून एवढी संपत्ती जमा होणं, मातोश्री 2 सारखी इमारत, गाड्या, फार्महाऊसेस निव्वळ अशक्य आहे. आमचाही हाच व्यवसाय आहे. मग संपत्तीत जमीन अस्मानाचा फरक कसा? असा सवाल याचिकेतून उपस्थित करण्यात आला आहे.

कोण आहेत गौरी भिडे?

सामना आणि मार्मिक प्रकाशित करणारा ठाकरे कुटुंबियांच्या मालकीचा ‘प्रबोधन’ प्रकाशनचा छापखाना जिथे आहे, त्याच्या शेजारीच गौरी भिडे यांच्या आजोबांचा ‘राजमुद्रा’ प्रकाशन हा छापखाना होता. वर्तमानपत्रांची छपाई, सर्क्युलेशन याचा हिशोब ठेवत त्याच्या दर्जाचे ग्रेडिंग करणारी एसीबी (ऑडिट सर्क्युलेशन ब्युरो) ही संस्था आहे. गौरी भिडे यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा दावा आहे की, सामना आणि मार्मिक यांचे एसीबी ऑडिटच झालेलं नाही. तसेच कोरोनाककळातही प्रबोधन प्रकाशनचा 42 लाखांचा टर्नओव्हर आणि 11.5 कोटींचा नफा कसा?, त्यामुळे हा पदाचा गैरवापर करत मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आर्थिक घोटाळे करत गोळा केलेला बेहिशोबी पैसा आहे, असा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.